Man Maze Chapala

मन माझें चपळ न राहे निश्चळ ।
घडी एकी पळ स्थिर नाहीं ||

आतां तूं उदास नव्हें नारायणा ।
धांवें मज दीना गांजियेलें ॥

धांव घालीं पुढें इंद्रियांचे ओढी ।
केलें तडातोडी चित्त माझें ॥

तुका ह्मणे माझा न चले सायास ।
राहिलों मी आस धरुनी तुझी ॥



Credits
Writer(s): Salil Kulkarni
Lyrics powered by www.musixmatch.com

Link