Havishi Vate

जीव झाला दंग, वाटे जग जरा हे गुंग थांबलं
भिरभिरे का मन हे तुझ्यात आज पण लागलं

तू हसावं, मी भिजावं रंग तू जणू प्रेमातला
बावरा मी, हावरा मी, ढंग हा म्हणू कोणता हा?
स्वप्न सारे उनाड झाले का जरा-जरा?

ओ-हो-हो, चिंब झालं उधाण आज वारं
हवीशी वाटे तू मला
ओ-हो-हो, चिंब झालं उधाण आज वारं
हवीशी वाटे तू मला

चांदणी तू आहे माझी, चंद्र तुझा मी
शोधतो तुला गं रोज डोळ्यात मी
तुझ्यासाठी जीव झुरला, थोडा सावरला
कधी-कधी तुझ्यामागे भलता भिरभिरला

का लागला गं नाद हा तुझा?
तू हसावं, मी भिजावं रंग तू जणू प्रेमातला
स्वप्न सारे उनाड झाले का जरा-जरा?

ओ-हो-हो, चिंब झालं उधाण आज वारं
हवीशी वाटे तू मला
चिंब झालं उधाण आज वारं
हवीशी वाटे तू मला

सर सुखाची बरसली रे आज ही अशी
रंगले तुझ्यात मी रे आज ही कशी
तुझ्यासाठी दिस-रात रोज मी तळमळते
तुझ्याकडे येता मी या जगा विसरते

मी झाले तुझी ऐकना आता
तू हसावं, मी भिजावं रंग तू जणू प्रेमातला
स्वप्न सारे उनाड झाले का जरा-जरा?

ओ-हो-हो, चिंब झालं उधाण आज वारं
हवासा वाटे तू मला
ओ-हो-हो, चिंब झालं उधाण आज वारं
हवासा वाटे तू मला



Credits
Writer(s): Rahul Kale, Vijay Bhate
Lyrics powered by www.musixmatch.com

Link