Utha Utha Swami Samartha

उठा-उठा स्वामी समर्था
उठा-उठा स्वामी समर्था
उठा-उठा स्वामी

अरुण उगवला...
अरुण उगवला कांचन किरणे
गगणाच्या धामी, समर्था, गगणाच्या धामी

उठा-उठा स्वामी समर्था
उठा-उठा स्वामी समर्था

चंद्रतारका पहा निमाल्या
फुलपंखानी कळ्या जागल्या
चंद्रतारका पहा निमाल्या
फुलपंखानी कळ्या जागल्या

श्रुष्टी रंगलेली...
श्रुष्टी रंगलेली आत्मानंदी
तंव मंगलनामी, समर्था, तंव मंगलनामी

उठा-उठा स्वामी समर्था
उठा-उठा स्वामी समर्था

स्वागतास हो सडा शिंपिला
अंतरीचा रंग गुंफिला, हो
स्वागतास हो सडा शिंपिला
अंतरीचा रंग गुंफिला

हात जोडुनी रे...
हात जोडुनी रे, भक्त उभे द्वारी
प्रभू, अंतरयामी, समर्था, प्रभू, अंतरयामी

उठा-उठा स्वामी समर्था
उठा-उठा स्वामी समर्था

तमो गुणाची निशा सरू द्या
सत्व गुणाची उषा झरू द्या
तमो गुणाची निशा सरू द्या
सत्व गुणाची उषा झरू द्या

तंव करुणेचा...
तंव करुणेचा प्रसाद घ्याया
ओंजळ ही स्वामी, समर्था, ओंजळ ही स्वामी

उठा-उठा स्वामी समर्था
उठा-उठा स्वामी समर्था
उठा-उठा स्वामी

अरुण उगवला...
अरुण उगवला कांचन किरणे
गगणाच्या धामी, समर्था, गगणाच्या धामी

उठा-उठा स्वामी समर्था
उठा-उठा स्वामी समर्था
उठा-उठा स्वामी समर्था



Credits
Writer(s): Sanjayraj Gaurinandan, Pravin Davane
Lyrics powered by www.musixmatch.com

Link