Unad Paus Mi

उनाड पाऊस मी
पल्याड माझी वस्ती
उनाड पाऊस मी
पल्याड माझी वस्ती
थेंबातुनी सांगतो कहाणी तीच ती

उनाड पाऊस मी
पल्याड माझी वस्ती
थेंबातुनी सांगतो
कहाणी तीच ती

तरी मी वाटतो नवा नवा
तरी मी वाटतो हवा हवा
तरी मी वाटतो नवा नवा
तरी मी वाटतो हवा हवा
भिजल्या सूरांत रुजतील माझी गाणी जुनी

उनाड पाऊस मी
पल्याड माझी वस्ती
उनाड पाऊस मी
पल्याड माझी वस्ती

बिलगून कोणी उभे, ह्या गच्च गार राती
मग थर-थरे ही काया, अन हात त्याच्या हाती
बिलगून कोणी उभे, ह्या गच्च गार राती
मग थर-थरे ही काया, अन हात त्याच्या हाती

स्पर्श माझा त्यांना आणि जवळ उगाच
ती ही त्याची, तो ही तिचा होऊन जाती
थेंबातुनी माझी या, कशी आज बरसे प्रीती

उनाड पाऊस मी
पल्याड माझी वस्ती
उनाड पाऊस मी
पल्याड माझी वस्ती

माळरान दिसले की, उतरतो त्यावर
गवताच्या पात्यावर, थेंबांची थर-थर
माळरान दिसले की, उतरतो त्यावर
गवताच्या पात्यावर थेंबांची थर-थर

झाडाखाली गुरे ओली, वाजतोय पावा
झाडाखाली गुरे ओली, वाजतोय पावा
क्षण भिजलेले त्यांना, कसा घालू आवर
कसा घालू आवर
खुळेपण ओले मन, थेंब माझे नाती

उनाड पाऊस मी
पल्याड माझी वस्ती
थेंबातुनी सांगतो कहाणी तीच ती
उनाड पाऊस मी
पल्याड माझी वस्ती
थेंबातुनी सांगतो कहाणी तीच ती

तरी मी वाटतो नवा नवा
तरी मी वाटतो हवा हवा
तरी मी वाटतो नवा नवा
तरी मी वाटतो हवा हवा
भिजल्या सूरांत रुजतील माझी गाणी जुनी

उनाड पाऊस मी
पल्याड माझी वस्ती
उनाड पाऊस मी
पल्याड माझी वस्ती



Credits
Writer(s): Nilesh Moharir, Ashwini C. Shende
Lyrics powered by www.musixmatch.com

Link