Nav Vadhu Priya Mee Bavarte

नववधू प्रिया, मी बावरते
नववधू प्रिया, मी बावरते
लाजते, पुढे सरते, फिरते
नववधू प्रिया, मी बावरते

कळे मला तु प्राण-सखा जरी
कळे तूच आधार सुखा जरी
कळे मला तु प्राण-सखा जरी
कळे तूच आधार सुखा जरी

तुजवाचूनी संसार फुका जरी
मन जवळ यावया गांगरते
नववधू प्रिया, मी बावरते

मला येथला लागला लळा
सासरी निघता दाटतो गळा
मला येथला लागला लळा
सासरी निघता दाटतो गळा

बाग-बगीचा, येथला मळा
सोडिता कसे मन चरचरते
नववधू प्रिया, मी बावरते

जीव मनीचा मनी तळमळे
वाटे बंधन करुनी मोकळे
जीव मनीचा मनी तळमळे
वाटे बंधन करुनी मोकळे

पळत निघावे तुजजवळ पळे
परि काय करू? उरी भरभरते
नववधू प्रिया, मी बावरते

आता तूच भय लाज हरी रे
धीर देऊनी ने नवरी रे
आता तूच भय लाज हरी रे
धीर देऊनी ने नवरी रे

भरोत भरतील नेत्र जरी रे
कळ पळभर मात्र खरे घर ते
कळ पळभर मात्र खरे घर ते
लाजते, पुढे सरते, फिरते
नववधू प्रिया, मी बावरते



Credits
Writer(s): Vasant Prabhu, B R Tambe
Lyrics powered by www.musixmatch.com

Link