Ganpati Raya Padate Mi Paya

गणपती राया पडते मी पाया
गणपती राया पडते मी पाया
काय मागू मागण रे
काय मागू मागण रे देवा
काय मागू मागण रे

तुझ्या दयेचा, तुझ्या कृपेचा
तुझ्या दयेचा, तुझ्या कृपेचा
आशीर्वाद राहू दे रे
हेच माझं सांगणं रे देवा
हेच माझं सांगणं रे

(हेच माझं सांगणं रे देवा)
(हेच माझं सांगणं रे)
(हेच माझं सांगणं रे देवा)
(हेच माझं सांगणं रे)

गणपती राया पडते मी पाया रे

नाही नवस सायास केले
कधी यात्रेला नाही गेले
नाही नवस सायास केले
कधी यात्रेला नाही गेले
परी मनात मी पुजीयेले
परी मनात मी पुजीयेले

तुझ्या भक्तीने आता सुखाने
तुझ्या भक्तीने आता सुखाने
भरले घर, आंगण रे
हेच माझं सांगणं रे देवा
हेच माझं सांगणं रे

(हेच माझं सांगणं रे देवा)
(हेच माझं सांगणं रे)
(हेच माझं सांगणं रे देवा)
(हेच माझं सांगणं रे)

गणपती राया पडते मी पाया रे

मोह सुखाचा नाही सोस
तुझ्या नावाचा लागे ध्यास
मोह सुखाचा नाही सोस
तुझ्या नावाचा लागे ध्यास
आता अंतरी उरली आस
आता अंतरी उरली आस

माझ्या कपाळी अखंड राहो
माझ्या कपाळी अखंड राहो
सौभाग्य चांदण रे
हेच माझं सांगणं रे देवा
हेच माझं सांगणं रे

(हेच माझं सांगणं रे देवा)
(हेच माझं सांगणं रे)
(हेच माझं सांगणं रे देवा)
(हेच माझं सांगणं रे)

गणपती राया पडते मी पाया रे

आता मागणं मागू कशाला
माझा संसार सोन्याचा झाला
आता मागणं मागू कशाला
माझा संसार सोन्याचा झाला
सुख लाभलं माझ्या जीवाला
सुख लाभलं माझ्या जीवाला

गुणी भरतार माझी लेकरं
गुणी भरतार माझी लेकरं
करं त्यांची राखणं रे
हेच माझं मागणं रे देवा
हेच माझं मागणं रे

तुझ्या दयेचा, तुझ्या कृपेचा
तुझ्या दयेचा, तुझ्या कृपेचा
आशीर्वाद राहू दे रे
हेच माझं सांगणं रे देवा
हेच माझं सांगणं रे

(हेच माझं सांगणं रे देवा)
(हेच माझं सांगणं रे)
(हेच माझं सांगणं रे देवा)
(हेच माझं सांगणं रे)

गणपती राया पडते मी पाया
गणपती राया रे



Credits
Writer(s): N/a Sanjay, Usha Dinanath Mangeshkar, Ashok Waingankar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link