Tula Shodhta Shodhta

तुला शोधता-शोधता कासावीस मन झाले
तुला शोधता-शोधता कासावीस मन झाले
किती करिशी मजला व्याकुळ? प्राण कंठी दाटले
तुला शोधता-शोधता कासावीस मन झाले

काहूर आठवणींचे क्षणाक्षणाला छळते
व्यथा मनाची माझ्या तशी न तुजला कळते

विसरलास का शपथा? की ते भास जहाले
तुला शोधता-शोधता कासावीस मन झाले
किती करिशी मजला व्याकुळ? प्राण कंठी दाटले
तुला शोधता-शोधता कासावीस मन झाले

ध्यास तुझाच जीवाला, माझे मीपण सरले
आता अवघे जगणे तुझ्याचसाठी उरले

रिते तुझ्याविन सारे नभ झाकोळून आले
तुला शोधता-शोधता कासावीस मन झाले
किती करिसी मजला व्याकुळ? प्राण कंठी दाटले
तुला शोधता-शोधता कासावीस मन झाले



Credits
Writer(s): Ashok Patki, Vijay Kuvlekar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link