Ganga Yamuna Dolyat - Bhav Geet

गंगा-जमुना डोळ्यांत उभ्या का?
गंगा-जमुना डोळ्यांत उभ्या का?
जा मुली, जा, दिल्या घरी तू सुखी रहा

कडकडुनी तू मिठी मारता बाळे
बालपण आले-आले, घुमवित घुंगुरवाळे
आठवले सारे-सारे, गहिवरले डोळे
आठवले सारे-सारे, गहिवरले डोळे

कढ मायेचे तुला सांगती, जा
जा मुली, जा, दिल्या घरी तू सुखी रहा

दारात उभी राहिली खिलारी जोडी
बघ दीर धाकले बसले खोळंबुन गाडी
पूस गं डोळे या पदराने, सावर ही साडी
पूस गं डोळे या पदराने, सावर ही साडी

रूप दर्पणी मला ठेवुनी, जा
जा मुली, जा, दिल्या घरी तू सुखी रहा

मोठ्याची तू सून पाटलीन मानाची
हसले तुझे गं हिरवे बिलवर लगीनचुडे
बघु नकोस मागे-मागे, लाडके बघ पुढे
बघु नकोस मागे-मागे, लाडके बघ पुढे

नकोस विसरू परि आईला, जा
जा मुली, जा, दिल्या घरी तू सुखी रहा



Credits
Writer(s): Vasant Desai, Vasant Pawar, Prabhu Vasant
Lyrics powered by www.musixmatch.com

Link