Malvani Rap

तर मंडळी
चतुर्थी येवदे, मे मिहनो येवदे, नायतर शिग्मो, धैकलो, आणि होळी येवदे
पण चाकरमानी, काम धंदो फाट्यार मारून कोकणात जातलें, म्हणजे जातलेंच

सना सुदिक गावाक जाउक तरी दी
नको धरु आमचा गळ्यावर सूरी
ओवर टाइम करुण कामा कर्तव् पूरी
गावाकरी वाट बघतत परब धुरी
नजरे समोर नुसतो, फिरता माझो गांव
काय काय दिसता, तुका सांगा तरी काय
काय काय दिसता, तुका सांगा तरी काय

जसा कौलारू छप्पर चिऱ्याची घरा
नागमोडी रस्ते, आणि पाण्याचा झरा
उकडीचो मोदक, खडखडे लाडु
मालवणी खाझा ता कसा सोडू
मायेचो सागर, मधाची गोडी,
समुद्रतली होडी, गार गार सोलकढी
मधाळ रसाळ गलियोंचो कहर मालवणी बोली
शिवराय प्रेमळ, स्पर्शानं कोकण पावन झाली
आरती अभंग भजनाची ओढ आमका लय भारी
देवाचा दारी गाराणी संकटा आमची नाईशी करी
संकटा आमची नाईशी करी

चतुर्थी ईली, आम्ही चलवं गावाक
मे महिनो इलो, आम्ही चलव गावाक
शिग्मो, धैकलो, होळी, सपतो, चलव गावाक
आम्ही चलव गावाक, आम्ही चलव गावाक

येवढा सांगलय तरी माझो सायब माका म्हणता

(क्या रे, साल के १२ महिने गावं जाता हैं
क्या है क्या तेरे कोकण मे
ना मोनो हैं, ना मेट्रो हैं, ना पिझा है, ना बर्गर है
ना 3 star, 5 start hotel है, ना बॉलीवूड, ना सेलिब्रेटी हैं
तो है क्या तेरे कोकण मे,
मालदिवस हैं क्या. जो घुमणे जात है)

आवशीचो घो तुझा काडशेक खोव
येवढा समजून सांगलंय, तरी करता भौ भौ
कोंकणांन काय दिल्यानं, परत एकदा सांगतंय
कान देऊन आयक, तुझा डोक्यात घालतंय

आंबे, काजी, फणस दिल्यान, नारळ दिल्यान फोपळ दिल्यान
दशावतारी राजा दिलो, हापूस ने जगात मान दिलो
मोठे मोठे भजन सम्राट दिले, लोककलेची परंपरा दिली
देशाक दिशा दाखवणारे, लोकमान्य ठिळक सारखे देश भक्त दिले

नवसाक पावणारे, हाकेक धावणारे
रवळनाथ, रामेश्वर, देवगडचो कुणकेश्वर
पावणाई, नवलाई, भराडी आई
नवसाक धाव घेई, धाव घेई

उन्हळा पावसाळा गार गार वारा
नको लोणावळा, नको खंडाळा
आंबोली घाटाचा swag निराळा
घुमट नृत्य बाल्या नाच
समुद्री किल्ले पर्यटन जिल्हे
ऐनारी गुफा, पांडवकालीन लेणी
सांगती अजब ऐतिहासिक कहाणी
निवती,भोगवे, सागर किनारे
ये ये सायबा बघून जारे
कुळदाची पिटी, माश्याचा सार
कोंबडी वडे वाटाण्याचा सांभार
शिरवाळे,आंबोळे,तांदळाचे घावणे
खावन तृप्त होतत पावणे
होतत पावणे
होतत पावणे

ह्या तुका थोडक्यात समजवलंय
कोकणाचो इतिहास काढलंय असतंय
तर तुझी शाळा घेऊची लागली असती
आणि मका इचारला, क्या हैं तेरे कोंकण मे

चल्लय मी

चतुर्थी ईली, आम्ही चल्लव गावाक
मे महिनो इलो, आम्ही चल्लव गावाक
शिग्मो, धैकलो, होळी, सपतो, चल्लव गावाक
आम्ही चल्लव गावाक, आम्ही चल्लव गावाक
आम्ही चलव गावाक



Credits
Writer(s): Sachin Satam
Lyrics powered by www.musixmatch.com

Link