Wah Re Shiva

वैरी उभा बिकट घडी
बेभान झेप उडी
समशेर धीट खडी
वाह रे शिवा

हे जात नको जीत हवी
जगण्याला रीत हवी
हीच एक बात बडी
वाह रे शिवा

लुटली शान शरम त्याला उभं छाटलं
रूप तुझं शिवा देवाहून मोठं वाटलं
लुटली शान शरम त्याला उभं छाटलं
रूप तुझं शिवा देवाहून मोठं वाटलं

रंग तुझा बाज तुझा आस्मानी धाक तुझा
शत्रूला धडकी उरी वाह रे शिवा

गडकोट रानीवनी रयतेच्या ध्यानीमनी
अंदाज आज नवा वाह रे शिवा

वाह रे शिवा, शिवा, शिवा
वाह रे शिवा, शिवा, शिवा

डोळा नजरेत वणव्याची आग रं
देव दैवाला दाखवून वाट रं
वीज वेगाने समशेर चालवी
आला आडवा तर मरणाशी गाठ रं

डोळा नजरेत वणव्याची आग रं
देव दैवाला दाखवून वाट रं
वीज वेगाने समशेर चालवी
आला आडवा तर मरणाशी गाठ रं

सुटलं भान रण हे तांडवात पेटलं
रूप तुझ शिवा शिवाहून मोठं वाटलं
सुटलं भान रण हे तांडवात पेटलं
रूप तुझ शिवा शिवाहून मोठं वाटलं

जगदंब नाम मुखी, आरंभ अंतरूपी
ठरवून चाले वाट शिव नरसिंह

शत्रू घमंड करी, संकट प्रचंड जरी
घेणार आज बळी शिव नरसिंह

कुटिल डावपेच भेकडाची चाल रं
तरीही दुश्मनाच्या दारावरती काळ रं
कुटिल डावपेच भेकडाची चाल रं
तरीही दुश्मनाच्या दारावरती काळ रं

प्रलयाची पार पीडा करण्याचा आज विडा
उचलून चाल करी शिव नरसिंह

जगदंब नाम मुखी, आरंभ अंतरूपी
ठरवून चाले वाट शिव नरसिंह

नरसिंह शिव शिव शिव
रुद्र शिव शिव शिव
नरसिंह शिव शिव शिव
हां रुद्र शिव शिव शिवराय
(जय भवानी!)

वाह रे शिवा, शिवा, शिवा
वाह रे शिवा, शिवा, शिवा



Credits
Writer(s): Hitesh Modak, Mangesh Kangane
Lyrics powered by www.musixmatch.com

Link