Angani Majhya Manachya

अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागले
दाटुनी आभाळ आले, मेघ बरसू लागले

अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागले
दाटुनी आभाळ आले, मेघ बरसू लागले
अशा चिंब ओल्या क्षणी, पुकारे तुझी साजणी
अशा चिंब ओल्या क्षणी, पुकारे तुझी साजणी

अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागले
दाटुनी आभाळ आले, मेघ बरसू लागले

चांदीची ही थेंब फुले, या माळुनी येती सरी
आणि मातीच्या गंधाने भरती सरसर घागरी
चांदीची ही थेंब फुले, या माळुनी येती सरी
आणि मातीच्या गंधाने भरती सरसर घागरी

धुंद नाचती उन्मनी, पुकारे तुझी साजणी
अशा चिंब ओल्या क्षणी, पुकारे तुझी साजणी

सा रे म प रे म प नी नी सा
सा नी प म रे नी रे सा

गार वारा, मन भरारा, शिरशिरी देही उठे
हा असा पाऊस आणि मी तुला शोधु कुठे?
गार वारा, मन भरारा, शिरशिरी देही उठे
हा असा पाऊस आणि मी तुला शोधु कुठे?

खोड ही तुझी रे जुनी, पुकारे तुझी साजणी
अशा चिंब ओल्या क्षणी, पुकारे तुझी साजणी

अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागले
दाटुनी आभाळ आले, मेघ बरसू लागले
अशा चिंब ओल्या क्षणी, पुकारे तुझी साजणी
अशा चिंब ओल्या क्षणी, पुकारे तुझी साजणी

अशा चिंब ओल्या क्षणी, पुकारे तुझी साजणी
अशा चिंब ओल्या क्षणी, पुकारे तुझी साजणी



Credits
Writer(s): Chandrashekhar Achut Sanekar, Gupte Avadhoot
Lyrics powered by www.musixmatch.com

Link