Khulya Jivala (From "Baloch")

(पापणीत तुझ्या पूनव चांदाची)
(कशी सखी, भराला आली?)
(उतू-उतू चाललं मनाचं मोहाळ)
(गालावर लाजची लाली)

खुळ्या जीवाला आस खुळी
खुळ्या जीवाला आस खुळी
गोऱ्या गाली पडे खळी

गुतून रहावी...
गुतून रहावी नजर तुझ्यातच
रहा, जिवलगा, तू जवळी, आस खुळी

खुळ्या जीवाला आस खुळी
गोऱ्या गाली पडे खळी
गुतून रहावी नजर तुझ्यातच
रहा, जिवलगा, तू जवळी, आस खुळी
खुळ्या जीवाला आस खुळी

(पापणीत तुझ्या पूनव चांदाची)
(कशी सखी, भराला आली?)
(उतू-उतू चाललं मनाचं मोहाळ)
(गालावर लाजची लाली)

तुला पाहता पहाट व्हावी
तुला पाहता पहाट व्हावी
तंव चांदाची रात नवी (रात नवी)
जडावली मिटतांना डोळे
तुझी समोरी मूर्ती हवी (मूर्ती हवी)

तुझ्या मिठीची, तुझ्या मिठीची
असता वाकळ घटका व्हावी सोनसळी

गुतून रहावी...
गुतून रहावी नजर तुझ्यातच
रहा, जिवलगा, तू जवळी, आस खुळी

(पापणीत तुझ्या पूनव चांदाची)
(कशी सखी, भराला आली?)
(उतू-उतू चाललं मनाचं मोहाळ)
(गालावर लाजची लाली)

नको दुरावा, साथ असावी
ओढ अनामिक बहरत जावी
हुरहूर सारी मनातली या
न सांगता मी तुला कळावी

रोज सकाळी ओठावरली
खुडून घ्यावी तूच कळी

गुतून रहावी नजर तुझ्यातच
रहा, जिवलगा, तू जवळी, आस खुळी
खुळ्या जीवाला आस खुळी
गोऱ्या गाली पडे खळी

गुतून रहावी नजर तुझ्यातच
रहा, जिवलगा, तू जवळी, आस खुळी

(पापणीत तुझ्या पूनव चांदाची)
(कशी सखी, भराला आली?)
(उतू-उतू चाललं मनाचं मोहाळ)
(गालावर लाजची लाली)

आस खुळी
आस खुळी



Credits
Writer(s): Guru Thakur, Narendra Bhide
Lyrics powered by www.musixmatch.com

Link