Pavasath Nahati - Original

पावसात न्हाहती लता-लता कळ्या, फुले
पावसात न्हाहती लता-लता कळ्या, फुले
सुगंध धुंद रात ही आज राज्य आपुले
पावसात न्हाहती...

शांत-शांत आसमंत, शीत वात धावतो
अंग-अंग चिंब हो चुकार थेंब चावतो

घे कुशीत आसरा जवळ येई प्रेमले
सुगंध धुंद रात ही आज राज्य आपुले
पावसात न्हाहती...

हाच योग ना सखे, तू मनात ठेवला
आयता धरातळी मिठीत चंद्र गावला

कोटरात पक्षीही असेच आज झोपले
सुगंध धुंद रात ही आज राज्य आपुले
पावसात न्हाहती...

पाहिजे तसे घडे लाज तरीही वाटते
सौख्य सहज लाभता भीती आत दाटते

गारठ्यातही उगा का कपोल तापले?
सुगंध धुंद रात ही आज राज्य आपुले
पावसात न्हाहती...



Credits
Writer(s): G D Madgulkar, Sudhir V Phadke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link