Premala

प्रेमाला ओढ आज त्या कुणाची?
रातरानी च्या फुलाची पाकळी हळूहळू फुलावी
प्रेमाला ओढ आज त्या कुणाची?
रातरानी च्या फुलाची धुंध आज प्रित मोहरावी

मनीच्या दिशा मोकळ्या अशा
छेडते कशा ताल ही नवी?
तुझे प्रेम रे माझ्या मना देई जणू नवी पालवी

प्रेमाला ओढ आज त्या कुणाची?
रातरानी च्या फुलाची पाकळी हळूहळू फुलावी

अरे, ऐक ना तुला सांगते
काज आज मिलनाची मनी वाजते
वाहते हवा आणि चांदवा भरते मनात आशा असे वाटते
असा हा शहरा मला आज दे ना
मीठी ही तुझी रे दे पुन्हा एकदा, हा

स्पर्श रंग हे लेउनी असे प्रेम चित्र हे कोण रंगवी?
गोड गोजिरे चित्र पाहण्या साथ रे मला तुझी ही हवी

प्रेमाला ओढ आज त्या कुणाची?
रातरानी च्या फुलाची पाकळी हळूहळू फुलावी

अरे, ऐक ना, मी ही ऐकते
एक ताल पावसाळी झंकारते
साज हे मनी थेंब छेडते
होऊनी नदी पुन्हा ही प्रीत वाहते

अवेळी ढगाला जशी जाग आली
तसा तू समोरी ये पुन्हा एकदा, आ

शोधते तुला प्रितिच्या वनी
वाट रे तुझी मेघ दाखवी
सोबती सरे सांजवेळ ही
वाटते मला ही हवी-हवी

प्रेमाला ओढ आज त्या कुणाची?
रातरानी च्या फुलाची पाकळी हळूहळू फुलावी



Credits
Writer(s): Avinash Shripad Chandrachud
Lyrics powered by www.musixmatch.com

Link