Tav Naynanche Dal

तव नयनांचे दल हलले ग
तव नयनांचे दल हलले ग, हलले ग

तव नयनांचे दल हलले ग
तव नयनांचे दल हलले ग
पानावरच्या दवबिंदूपरी
पानावरच्या दवबिंदूपरी
त्रिभुवन हे डळमळले ग

तव नयनांचे दल हलले ग, हलले ग
नयनांचे दल हलले ग

तारे गळले, वारे ढळले
दिग्गज पंचाननसे वळले
तारे गळले, वारे ढळले
दिग्गज पंचाननसे वळले

गिरी ढासळले, सूर कोसळले
गिरी ढासळले, सूर कोसळले
ऋषी, मुनी, योगी
ऋषी, मुनी, योगी चळले ग, चळले ग

तव नयनांचे दल हलले ग, हलले ग
नयनांचे दल हलले ग

ऋतुचक्राचे आस उडाले
आभाळातून शब्द निघाले
ऋतुचक्राचे आस उडाले
आभाळातून शब्द निघाले

आवर, आवर आपुले भाले
आवर, आवर आपुले भाले
मीन जळी तळमळले ग

तव नयनांचे दल हलले ग, हलले ग
नयनांचे दल हलले ग

हृदयी माझ्या चकमक झडली
हृदयी माझ्या चकमक झडली
नजर तुझी धरणीला भिडली
नजर तुझी धरणीला भिडली

दोन हृदयांची किमया घडली
दोन हृदयांची किमया घडली
पुनरपी जग सावरले ग

तव नयनांचे दल हलले ग
पानावरच्या दवबिंदूपरी
पानावरच्या दवबिंदूपरी
त्रिभुवन हे डळमळले ग

तव नयनांचे दल हलले ग, हलले ग
नयनांचे दल हलले ग



Credits
Writer(s): Salil Kulkarni, Sudhir Moghe
Lyrics powered by www.musixmatch.com

Link