Man Mogara

तुझ्या वाटेवर
आसवांचा सडा
ओले ओले डोळे
मी कोरडा
दिसता पुन्हा
हसताना तू
जगायचे मला
नसताना तू

तरी मन वेड
तुझ्या माग माग
जणू क्षितिजकड
पळत राही

मन मोगरा दरवळत राही
तुझ्या येनीमंदी कळत नकळत राही
तू वळून पाहिलं नाही
मन मोगरा कोमेजून जाई
मन मोगरा कोमेजून जाई

तुला जीव लावणे
तुज प्रेम करणे
एवढेच होते हातात माझ्या
तुला कुरवाळणे
तुज गोंजारने
एवढेही माझ्या नशिबात नव्हते
होता कठीण
निर्णय तुझ्यावर
प्रेम करत राहण्याचा
तुझ्याशिवाय
दुसऱ्या कुणाचे
विचार मनात अजिबात नव्हते

विरली दरवळ
थांबली हवा
जुनीच घुसमट
अन श्वास नवा
पाहिले मी पुढे
जाताना तू
क्षणात परकी
होताना तू

तरी मन वेड
तुझ्या माग माग
जणू क्षितिजाकडं
पळत राही

मन मोगरा दरवळत राही
तुझ्या येनीमंदी कळत नकळत राही
तू वळून पाहिलं नाही
मन मोगरा कोमेजून जाई
मन मोगरा कोमेजून जाई



Credits
Lyrics powered by www.musixmatch.com

Link