Saavalya (From "Teen Adkun Sitaram")

सावल्या पांगल्या, पाखरे हरवली
राहिले घर कुठे? आस हि संपली
दुखऱ्या डोळ्यांना रास्ता सोसेना
दिशांना कशी दया येईना? येईना

सावल्या पांगल्या, पाखरे हरवली
राहिले घर कुठे? आस हि संपली

काचेचे स्वप्न हे, रुतणारे प्रश्न हे
फुटलेले आरसे, नाही एक ठसा
या खोट्या सांत्वना, हि सच्ची वेदना
वांझोट्या प्रार्थना, शोधू देव कसा?

देणे कोणाचे, कोणे मौनाचे
सोडवू किती? काय सुटेना

सावल्या पांगल्या, पाखरे हरवली
राहिले घर कुठे? आस हि संपली



Credits
Writer(s): Agnel Roman, Vaibhav Joshi
Lyrics powered by www.musixmatch.com

Link