Kadhi Na Kadhi (From "Time Please")

कधी ना कधी, कधी ना कधी
कधी ना कधी, कधी ना कधी
कधी ना कधी, कधी ना कधी

मी दूर-दूर जाताना इतकेच मनाशी वाटे
अनोळखी या वळणावर जुळून यावे हे नाते
हा काळोखाचा पदर होईल कधीतरी दूर
स्वप्नांच्या गावी येईल मग आठवणींचा पूर

समजावतो मी या मना
कधी ना कधी, कधी ना कधी
कधी ना कधी, कधी ना कधी
कधी ना कधी, कधी ना कधी

वाटा या बंद साऱ्या आसवांना नसे किनारा
ये तू घेऊन आता वादळाचा आवेग सारा
मग विरून जाईल अंतर अन फुटेल सगळा बांध
कोसळत्या दोन मनांचा जुळेल रेशीम बंध

आठवेल सारे बघ तुला
कधी ना कधी, कधी ना कधी
कधी ना कधी, कधी ना कधी
कधी ना कधी, कधी ना कधी

राती सुन्या-सुन्या ह्या
दिवसजाळी क्षणा-क्षणांना
हाती तुझ्याच आहे मोडलेला हा निवारा
कुठल्याश्या एका वेळी बस वळून पहा तू मागे

दिसतील तुला तेव्हा ही वाटेवर डोळे माझे
परतून येशी तू पुन्हा
कधी ना कधी, कधी ना कधी
कधी ना कधी, कधी ना कधी
कधी ना कधी, कधी ना कधी



Credits
Writer(s): Kshitij Patwardhan, Rishikesh Kamerkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link