Mala Ved Laagale ( Duet )

रंगबावऱ्या स्वप्नांना सांगा रे, सांगा
कुंदकळ्यांना वेलींना सांगा रे, सांगा
"हे भास होती कसे? हे नाव ओठी कुणाचे?"
का सांग वेड्या मना मला भान नाही जगाचे?

मला वेड लागले प्रेमाचे
मला वेड लागले प्रेमाचे, प्रेमाचे, प्रेमाचे

नादावले, धुंदावले, कधी गुंतले मन बावळे?
न कळे कसे, कोणामुळे सूर लागला मनमोकळे
हा भास कि तुझी आहे नशा?
मला साद घालती दाही दिशा

मला वेड लागले प्रेमाचे
मला वेड लागले प्रेमाचे, प्रेमाचे, प्रेमाचे

जगणे नवे वाटे मला, कुणी भेटले माझा मला
खुलता कळी उमलून हा मनमोगरा गंधाळला
हा भास कि तुझी आहे नशा?
मला साद घालती दाही दिशा

मला वेड लागले प्रेमाचे
मला वेड लागले प्रेमाचे, प्रेमाचे, प्रेमाचे



Credits
Writer(s): Guru Thakur, Mahesh, Chinar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link