Darshan De Re Bhagwanta

दर्शन दे रे, दे रे भगवंता
दर्शन दे रे, दे रे भगवंता
किती अंत आता पाहशी, अनंता?
किती अंत आता पाहशी, अनंता?

दर्शन दे रे, दे रे भगवंता
दर्शन दे रे, दे रे भगवंता

माय-पित्याची सेवा पुंडलिकाची
माय-पित्याची सेवा पुंडलिकाची
भक्ती पाहिली तू गोऱ्या कुंभाराची
भक्ती पाहिली तू गोऱ्या कुंभाराची

ऐसे येणे व्हावे तुझे कृपावंता
ऐसे येणे व्हावे तुझे कृपावंता
दर्शन दे रे, दे रे भगवंता
दर्शन दे रे, दे रे भगवंता

ऐकताच वाणी संत चोखोबाची
ऐकताच वाणी संत चोखोबाची
साक्षात प्रगटे मूर्ती विठ्ठलाची
साक्षात प्रगटे मूर्ती विठ्ठलाची

ऐसे दान देसी तुझ्या प्रिय संता
ऐसे दान देसी तुझ्या प्रिय संता
दर्शन दे रे, दे रे भगवंता
दर्शन दे रे, दे रे भगवंता

तूच जन्मदेता, तूच विश्वकरता
तूच जन्मदेता, तूच विश्वकरता
मन शांत होई तुझे गुण गाता
मन शांत होई तुझे गुण गाता

हीच एक आशा पूरवी तू आता
हीच एक आशा पूरवी तू आता
दर्शन दे रे, दे रे भगवंता
दर्शन दे रे, दे रे भगवंता

किती अंत आता पाहशी, अनंता?
किती अंत आता पाहशी, अनंता?
दर्शन दे रे, दे रे भगवंता
दर्शन दे रे, दे रे भगवंता
दर्शन दे रे, दे रे भगवंता



Credits
Writer(s): Madhukar Patak, Sonu Ajmeri
Lyrics powered by www.musixmatch.com

Link