To Mhanala Ekda

तो म्हणाला एकदा, "मेघ बोलावा जसा
मी तुझा प्रारंभ आणि मीच आहे सांगता"
तो म्हणाला एकदा, "मेघ बोलावा जसा
मी तुझा प्रारंभ आणि मीच आहे सांगता"
तो म्हणाला एकदा...

तो थरारून एकदा हो उन्हातील आरसा
तो थरारून एकदा हो उन्हातील आरसा
अजून मी सांभाळते तो कोंदलेला कवडसा
अजून मी सांभाळते तो कोंदलेला कवडसा
—तो कोंदलेला कवडसा

तो म्हणाला एकदा, "मेघ बोलावा जसा
मी तुझा प्रारंभ आणि मीच आहे सांगता"
तो म्हणाला एकदा...

तो उसासून एकदा गात असे वेणू जसा
तो उसासून एकदा गात असे वेणू जसा
नांदते प्राणात तेव्हा पश्चिमेची स्तब्धता
नांदते प्राणात तेव्हा पश्चिमेची स्तब्धता
—पश्चिमेची स्तब्धता

तो म्हणाला एकदा, "मेघ बोलावा जसा
मी तुझा प्रारंभ आणि मीच आहे सांगता"
तो म्हणाला एकदा...

तो असा अन एकदा, तो कसा अन कैकदा?
तो असा अन एकदा, तो कसा अन कैकदा?
तोच माझी गहनता अन थांग ही माझ्यातला
तोच माझी गहनता अन थांग ही माझ्यातला
—थांग ही माझ्यातला

तो म्हणाला एकदा, "मेघ बोलावा जसा
मी तुझा प्रारंभ आणि मीच आहे सांगता"
तो म्हणाला एकदा, "मेघ बोलावा जसा
मी तुझा प्रारंभ आणि मीच आहे सांगता"
तो म्हणाला एकदा...



Credits
Writer(s): Dr. Salil Kulkarni, Salil Kulkarni, Sandeep Khare
Lyrics powered by www.musixmatch.com

Link