Sairat Jhala Ji

अलगुज वाजं नभात
भलतंच झालंया आज
अलगद आली मनात
पहीलीच तरनी ही लाज

हो आगं झनानलं काळजामंदी
आन् हातामंदी हात आलं जी

सैराट झालं जी
सैराट झालं जी
सैराट झालं जी

हं बदलून गेलंया सारं
पिरतीचं सुटलंया वारं
अल्लड भांबावल्यालं
बिल्लोरी पाखरु न्यारं

आलं मनातलं
ह्या व्हटामंदी
आन् हातामंदी हात आलं जी

सैराट झालं जी
सैराट झालं जी
सैराट झालं जी

हं कवळ्यापनात ह्या
सावळ्या उन्हात ह्या
बावळ्या मनात ह्या भरलं
(भरलं)
तुझं गाणं मनामंदी
घुमतयं कानामंदी
सुर सनईचं राया सजलं

हे सजलं, ऊनवारं नभतारं सजलं
रंगलं मन हळदीनं रानी रंगलं
सरलं हे जगण्याचं झुरणं सरलं
भिनलं नजरनं इश जहरी भिनलं

आगं धडाडलं
ह्या नभामंदी
आन् ढोलासंगं गात आलं जी

सैराट झालं जी
सैराट झालं जी
सैराट झालं जी

हं आकरीत घडलंया
सपान हे पडलंया
गळ्यामंदी सजलंया डोरलं
(डोरलं)
साताजल्माचं नात
रुजलंया काळजात
तुला रं देवागतं पुजलं

हे रुजलं, बीज पिरतीचं सजनी रुजलं
भिजलं मन पिरमानं पुरतं भिजलं
सरलं मन मारुन जगनं सरलं
हरलं ह्या पिरमाला समदं हरलं
आगं कडाडलं
पावसामंदी
अन् आभाळाला याद आलं जी



Credits
Writer(s): Atul Gogavale, Ajay Gogavale
Lyrics powered by www.musixmatch.com

Link