Jaanta Ajaanta - Male (From "Lagna Pahave Karun")

जाणता, अजाणता कोठून येई असे प्रेम हे?
जाणता, अजाणता कवेत घेई असे प्रेम हे
जसे अलगद वाऱ्यासवे दरवळती गंध नवे
जसे अवखळ स्पंदनांचे गुनगुनते गीत नवे

गुंतता ह्रदय हे क्षणात होई मन बावरे
श्वास हे, आभास हे बेधुंद सारे हे कसे
अबोल ही चाहूल अंतरी का दाटली?
मेघात ओली ही नशा

थोडेसे कोवळे, थोडे नवे-नवे
वाटते प्रेम हे हवे-हवे
हो, आतुर जीव हा, काहूर हे मनी
जुनीच रीत ही का प्रीत ही

जसे अल्लड लाटेसवे मन तरते, हरवते
जसे अवखळ भावनांचे गुनगुनते गीत नवे



Credits
Writer(s): Ajay Naik
Lyrics powered by www.musixmatch.com

Link