Choru Chorun

चोरू चोरून पाहतं फुल हसून लाजतं
गाणं आमच्या वरातीचं माझा मनात वाजतं

चोरू चोरून पाहतं फुल हसून लाजतं
गाणं आमच्या वरातीचं माझा मनात वाजतं

त्याचं बोलणं कमाल, त्याचं हसणं कमाल
त्याच्या वाटेवरतीचं माझा पडतो रुमाल
त्याचं बोलणं कमाल, त्याचं हसणं कमाल
त्याच्या वाटेवरतीचं माझा पडतो रुमाल

मंडपाच्या दारावरी त्याचं करीन स्वागत
मंडपाच्या दारावरी त्याचं करीन स्वागत
गाणं आमच्या वरातीचं माझा मनात वाजतं

त्याच्या मागे बसुनिया साऱ्या जगात फिरावं
ओल्या-ओल्या सरी आणि थोडं धुकं पांघरावं
त्याच्या मागे बसुनिया साऱ्या जगात फिरावं
ओल्या-ओल्या सरी आणि थोडं धुकं पांघरावं

ऊब थोडीशी मखमली ऊन उन्हाला मागतं
ऊब थोडीशी मखमली ऊन उन्हाला मागतं
गाणं आमच्या वरातीचं माझा मनात वाजतं

नटली गं अमराई, सारं सजलं शिवार
शिकारीला गेले बाई, झाली माझीच शिकार
नटली गं अमराई, सारं सजलं शिवार
शिकारीला गेले बाई, झाली माझीच शिकार

एका ताऱ्याच्या आशेनं सारं चांदणं जागतं
एका ताऱ्याच्या आशेनं सारं चांदणं जागतं
गाणं आमच्या वरातीचं माझा मनात वाजतं

रोज स्वप्नात येतो, माझा घरधनी होतो
ओठ हलतात माझे पण साजनचं गातो
रोज स्वप्नात येतो, माझा घरधनी होतो
ओठ हलतात माझे पण साजनचं गातो

यावा वरात घेऊन सूर सनई सोबत
यावा वरात घेऊन सूर सनई सोबत
चोरू चोरून पाहतं फुल हसून लाजतं
गाणं आमच्या वरातीचं माझा मनात वाजतं



Credits
Writer(s): Sanjeev-darshan
Lyrics powered by www.musixmatch.com

Link