Mann Paltaya (From "Kaasra")

जोडाया नाती साता जन्माची
आले मी तुझ्या पायी रं
व्हणार बाई माझा तू धनी
मनाशी ठरलया रं
थोड इपरीत घडतया
घोड कुठ हे अडतया
पाहिनाच झालाय का तू मला
पेटतया काळीज का
ठिणगी न्हव वणवा हा
इझव आगीला कर तुझीच मला
मन पळतया उनाड बनुनी तुझ्या मागं सख्या
मन उडतया पाखरू बनुनी तुझ्या मागं सख्या
मन पळतया उनाड बनुनी तुझ्या मागं सख्या

मनाच्या तळाशी इस्पोट झाला
तळमळतय का माझं मन हे खुळ
कसं सांग रोखू आतुर जीवाला
धड धड वाढलीया तुझ्याच मूळ
सूर तुझ्याशी जुळतोया जीव ताल धरतोया
गीत हे स्पूरले कसे न बोलता
सांगू कशी आज तुला लागला तुझाच लळा
साता जन्माची साथ हवी रं मला
मन पळतया उनाड बनुनी तुझ्या मागं सख्या
मन उडतया पाखरू बनुनी तुझ्या मागं सख्या
मन पळतया उनाड बनुनी तुझ्या मागं सख्या

ग्वाड ग्वाड दिसते ती हसतीया गाली
सर्गातील जणू सुंदरी नक्षत्रावानी
अवचित आली कशी सोन पावलानी
पिरमात पडली झाली राजाची राणी

हो... चांदावानी तुझं रूप गं मला याड लावतय
तुझं गालामंदी हसणं लय ग्वाड वाटतंय
हो... चांदावानी तुझं रूप गं मला याड लावतय
तुझं गालामंदी हसणं लय ग्वाड वाटतंय
पिरमामंदी पडलोया खुळ्यागत झालो म्या
ठसे तुझे कोरले मी काळजात या
काळजाचा ठोका ह्यो चुकतो पाहुनी तुला
जिथं जिथं पाहू तूच दिसते मला
मन पळतया उनाड बनुनी तुझ्या मागं सखे
मन उडतया पाखरू बनुनी तुझ्या मागं सखे
मन पळतया उनाड बनुनी तुझ्या मागं सखे



Credits
Writer(s): Prashant Nakti
Lyrics powered by www.musixmatch.com

Link