Nach Go Baya

(काठ-पदरी साडी गं, पैजण हे पायामंदी)
(नथ कशी शोभे हिच्या नाकी गं)
(काजळ हे डोळ्यामंदी, हिरव्या हाती बांगड्या)
(मराठमोळी बया सजली गं)

माझे बाय, तू tension घेतेस काय?
माझे बाय, थोडं relax होशील काय?
संसाराचं pressure थोडं दुर लोट तू
कामा-धंद्याचं हे दडपण इसर जरा तू

ए, थोडा वेळ काढुन जगना स्वतःसाठी तू गं
बेधुंद होऊनी, बया, थिरक जरा तू

इसरून साऱ्या जगाला सैरभैर नाच, ओ, नाच गो बया (नाच गो बया)
थोडं मराठमोळं नाच, ओ, नाच गो बया (नाच गो बया)
दिल खोलुन आज तू नाच, ओ, नाच गो बया (नाच गो बया)
जरा ठुमका तू लाऊन नाच...

ईडापिडा दूर होऊ दे, माझे माय गं
सुख तुला सारं मिळू दे
ए, संसाराची येस माऊली वलांडून ये तू
भरारी तू गगनामंदी घे

ए, आता लाजू नको
तुझी मेहनत जगाला पटवून दे
माघार घेऊ नको
तुझी ताकद साऱ्यांना दाखवून दे

वळख स्वतःला जरा, कर अभिमान
सिद्ध कर स्वतःला तू लावूनिया जान, ओ, नाच गो बया (नाच गो बया)
जरा मराठमोळं नाच, ओ, नाच गो बया (नाच गो बया)
ओ, दिल खोलुन आज तू नाच, ओ, नाच गो बया (नाच गो बया)
जरा ठुमका तू लाऊन नाच...

Hey, सखे गं मैतरनी, घालू फू-बाई-फुगडी
पदर कमरेला खोचुनी पिंगा खेळू चल बाई
सखे गं मैतरनी, घालू फू-बाई-फुगडी
पदर कमरेला खोचुनी पिंगा खेळू चल बाई

नवरोबा आहेत माडीवरी
(अगं-अगं बया, नाचू मी कशी?)
सासूबाई बसल्यात दारावरी
(अगं-अगं बया, नाचू मी कशी?)

अगं, नणंद आलीया माहेरी
(अगं-अगं बया, नाचू मी कशी?)
करायची आहेत धुणी भांडी
(अगं-अगं बया, नाचू मी कशी?)

येळ झालीया रांधायची
(अगं-अगं बया, नाचू मी कशी?)
चिंता पोरा-बाळांची
(अगं-अगं बया, नाचू मी कशी?)

थोडा येळ काढुनी तू स्वतःसाठी नाच (अगं-अगं)
संसाराचं बसवाया इसरून तू नाच, ए, नाच गो बया (नाच गो बया)
थोडं मराठमोळं नाच, नाच गो बया (नाच गो बया)
दिल खोलुन आज तू नाच, नाच गो बया (नाच गो बया)
जरा ठुमका तू लाऊन नाच...



Credits
Writer(s): Prashant Nakti, Sanket Gurav
Lyrics powered by www.musixmatch.com

Link