Nako Aarti Ki Nako Pushpamala

नको आरती की, नको पुष्पमाला
नको आरती की, नको पुष्पमाला
प्रभू भोवताली असे व्यापलेला
नको आरती की, नको पुष्पमाला

खगांच्या मुखाने प्रभु गाई गाणे
खगांच्या मुखाने प्रभु गाई गाणे
फुलांतून उधळी सुगंधी उखाणे
गगनात फुलवी नवरंग लीला
नको आरती की, नको पुष्पमाला

सदासर्वकाळी दुज्यांसाठी झिजतो
सदासर्वकाळी दुज्यांसाठी झिजतो
पुण्यवान जगती खरा तोच जगतो
त्यागात मनुजा उभा स्वर्ग भरला
नको आरती की, नको पुष्पमाला

प्रकाशात फुलतो अंधार काळा
प्रकाशात फुलतो अंधार काळा
उन्हापाठी पळतो कसा पावसाळा?
बुडे प्रेमरंगी कळे खेळ त्याला

नको आरती की, नको पुष्पमाला
प्रभु भोवताली असे व्यापलेला
नको आरती की, नको पुष्पमाला



Credits
Writer(s): Shrikant Thakare, Vandana Vitankar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link