Madanmanjiri (From "Phullwanti")

ही किती कोवळी नार रूप अरूवार
गोमटी फार देह सुकुमार
सखी साजणी ॥
ही कशी अनोखा बहर जळाशी लहर
भिनावे जहर आठ ही पहर
खणी खंजिरी ॥

ही कशी चमकती बिजली सोनसळी सजली ॥
ही किती सावळी धजली रूप्यामधे भिजली ॥
ही कशी रूप तारका ॥
जणु चित्तचोर नायिका
नवनेली ऽऽ
मतवाली ऽऽ
अलबेली ऽऽ

कानी असल किरत माझी देखणी सुरत
नाही हटत कुणाच्या नजरा
माझी पाटी हाय कोरी माझं रूप लई भारी
नटे सावरी
माळून हो गजरा
तुम्ही जरा - तुम्ही जरा, तुम्ही जरा बघा तरी
अशी मी - मदन मंजिरी
सुबक ठेंगणी भिरभिरते भिंगरी
अशी मी - मदन मंजिरी
चटक चांदणी चमचमते अंबरी

अशी नटरंगी बाई सा-या दुनियेत नाही
कसं बेभान होती सारं हिच्यापुढती

अशी मी - मदन मंजिरी
सुबक ठेंगणी भिरभिरते भिंगरी
अशी मी - मदन मंजिरी
चटक चांदणी चमचमते अंबरी

भरवसा ऽऽ दिलाचा कसा
धरावा बाई जीव हा जाई
पेटुनी -
कवडसा ऽऽ अहो राजसा
दिसना काही होतसे लाही
तनमनी -
नाद हाय लई खुळा माझ्या घुंगराचा चाळा
सोनं नाणं - उधळती मोहरा
माझ्या नजरेचा बाण काळजात घुमशान
खोल जाऊनं - रूतलं ह्यो गहिरा
तुम्ही जरा - तुम्ही जरा,तुम्ही जरा बघा तरी
अशी मी - मदन मंजिरी
सुबक ठेंगणी भिरभिरते भिंगरी
अशी मी - मदन मंजिरी
चटक चांदणी चमचमते अंबरी

माझं रूप,बघून सारं खुळं
फिरती मागं पुढं
नाव मी, सांगू कुणाचं आज
माझी अदा,बघून येडं पिसं
कळना रात दिसं
लागला भल्यभल्याना नाद
तरी कसा, एक पाव्हणा
साधी नजर देईना बाई
आला शीणं, कळना मनं
कोणती युगत करू मी बाई
तुम्हा हाय काय ठाव, मी बी देत नाही भाव
तरी राव, अदबीनं मुजरा
माझी बात लई भारी, अशी हाय अदाकारी
शोभं त्यावरी, नाजूक ह्यो नखरा

तुम्ही जरा - तुम्ही जरा, तुम्ही जरा बघा तरी
अशी मी - मदन मंजिरी
सुबक ठेंगणी भिरभिरते भिंगरी
अशी मी - मदन मंजिरी
चटक चांदणी चमचमते अंबरी



Credits
Writer(s): Avinash Vishwajeet, Dr. Prasad Biware
Lyrics powered by www.musixmatch.com

Link