Phiruni Navyane Janmena Mi (From "Gulaabi")

नव्याने पालवी उमळली जीला ती वेल झाले मी
नव्याने सावली उमगली जीला ती वेळ झाले मी
मी शोधला आहे आता माझा खरा आरसा
मी टाळला मुखवट्यावरी चेहऱ्याचा भरवसा
अडखळताना कोसळताना सावरेन मी
फिरुनी नव्याने जन्मेन मी
फिरुनी नव्याने जन्मेन मी
जन्मेन मी
जन्मेन मी

चांदणे अंगावरी गोंदताना
काजळी रात्रीस ही रातराणी वेचू जरा
देती साद मला बहरलेल्या दिशा
मी शोधला आहे आता माझा खरा आरसा
मी टाळला मुखवट्यावरी चेहऱ्याचा भरवसा
अडखळताना कोसळताना सावरेन मी
फिरुनी नव्याने जन्मेन मी
फिरुनी नव्याने जन्मेन मी
जन्मेन मी

फुल मागून थकले आनंदाच्या झाडाची
मूळ तोडून चुकले आयुष्याच्या वेडाची
ओठांपाशी येता येता हुंदके वाहून गेले
वर्षा मागून वर्षे सरली जगणे राहून गेले
जगणे राहून गेले
मी शोधला आहे आता माझा खरा आरसा
मी टाळला मुखवट्यावरी चेहऱ्याचा भरवसा
अडखळताना कोसळताना सावरेन मी
फिरुनी नव्याने जन्मेन मी
फिरुनी नव्याने जन्मेन मी
जन्मेन मी



Credits
Writer(s): Mandar Cholkar, Sai Piyush
Lyrics powered by www.musixmatch.com

Link