Utha Utha Ho Sakalik

उठा उठा हो सकळिक
वाचे स्मरावा गजमुख
ऋद्धि-सिद्धिचा नायक
सुखदायक भक्तांसी
(उठा, उठा हो सकळिक)
(वाचे स्मरावा गजमुख)

अंगी शेंदुराची उटी
माथां शोभतसे कीरिटी
केशर कस्तूरी लल्लाटीं
हार कंठी साजिरा

(उठा, उठा हो सकळिक)
(वाचे स्मरावा गजमुख)

कानीं कुंडलांची प्रभा
सूर्य-चंद्र जैसे नभा
कानीं कुंडलांची प्रभा
सूर्य-चंद्र जैसे नभा

माजीं नागबंदी शोभा
स्मरतां उभा जवळी तो

(उठा, उठा हो सकळिक)
(वाचे स्मरावा गजमुख)

कांसे पीतांबराची घटी, हाती मोदकांची वाटी
रामानंद स्मरतां कंठी, तो संकटी पावतो

(उठा, उठा हो सकळिक)
(वाचे स्मरावा गजमुख)
(वाचे स्मरावा गजमुख)



Credits
Writer(s): Hridaynath Mangeshkar, Harnish Ambaliya, Ramanand
Lyrics powered by www.musixmatch.com

Link