Chandane Shimpit Jashi

चांदणे शिंपीत जाशी
चालता तू चंचले
चांदणे शिंपीत जाशी
चालता तू चंचले

ओंजळी उधळीत मोती
ओंजळी उधळीत मोती
हासरी ताराफुले
चांदणे शिंपीत जाशी
चालता तू चंचले

वाहती आकाशगंगा
की कटीची मेखला
वाहती आकाशगंगा
की कटीची मेखला
की कटीची मेखला

तेजपुंजाची झळाळी
तार पदरा गुंफिले

ओंजळी उधळीत मोती
हासरी ताराफुले
चांदणे शिंपीत जाशी
चालता तू चंचले

गुंतवीले जीव हे
गुंतवीले जीव हे
मंजीर की पायी तुझ्या

जे तुझ्या तालावरी
बोलांवरी नादावले

ओंजळी उधळीत मोती
हासरी ताराफुले
चांदणे शिंपीत जाशी
चालता तू चंचले

गे निळावंती कशाला?
झाकिसी काया तुझी
गे निळावंती कशाला?
झाकिसी काया तुझी
झाकिसी काया तुझी

पाहु दे मेघाविन
सौंदर्य तुझे मोकळे

ओंजळी उधळीत मोती
हासरी ताराफुले
चांदणे शिंपीत जाशी
चालता तू चंचले



Credits
Writer(s): Raja Badhe, Hridaynath Mangeshkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link