Ha Rusava Sod

हा रुसवा सोड सखे! पुरे हा बहाणा
सोड ना अबोला!
झुरतो तुझ्याविना, घडला काय गुन्हा?
बनलो निशाना, सोड ना अबोला!

इष्काची दौलत उधळि तुझा हा नखरा
मुखचंद्राभवती कितीक फिरती नजरा
फसवा राग तुझा, अलबेला नशिला
करि मदहोश मला
नुरले भान अतां, जाहला जीव खुळा

तुझे फितूर डोळे गाती भलत्या गजला
मदनाने केले मुष्किल जगणे मजला
पाहुनी मस्त अदा, फुले अंगार असा
सावरू तोल कसा?
नको छळवाद अतां, झालो कुर्बान तुला



Credits
Writer(s): Shrikant Thakare, Vandana Vitankar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link