Zunju Munju Pahat Zali

झुंजूमुंजू पहाट झाली (कोंबड्यानं बाग दिली)
सूर्याला लाली आली (धरतीला जाग आली)
भिरभिरती रानी-वनी पाखरं
भिरभिरती रानी-वनी पाखरं

(मैतर माझ्या रं, ढवळ्या न पवळ्या)
(शेताला घेऊन चाल रं)
(मैतर माझ्या रं, ढवळ्या न पवळ्या)
(शेताला घेऊन चाल रं)

धुकं पडला हे दाट, अंधारली वाट
घाटमाथ्यातुन वाहे पाट
(घाटमाथ्यातुन वाहे पाट)
सूर धरी ही मोट किरकिरं रं हाट
पाणी ओढ्याचं ओढीत लाट
(पाणी ओढ्याचं ओढीत लाट)

नागमोडीनं चालली ही वाट रं
(रानफुलांचा घमघमतो वास रं)

(मैतर माझ्या रं, ढवळ्या न पवळ्या)
(शेताला घेऊन चाल रं)
(मैतर माझ्या रं, ढवळ्या न पवळ्या)
(शेताला घेऊन चाल रं)

शेताच्या बांधावर (बांधाच्या झाडावर)
झाडाच्या फांदीवर (फांदीच्या पानावर)

पानाच्या घरट्यात लपून बसलंय कोण रं
(त्याला गोफण गुंड्यानं हाण रं)

(मैतर माझ्या रं, ढवळ्या न पवळ्या)
(शेताला घेऊन चाल रं)
(मैतर माझ्या रं, ढवळ्या न पवळ्या)
(शेताला घेऊन चाल रं)

दूर गेली नजर, डोईवरती पदर
घरची लक्षुमी शेताला आली
(घरची लक्षुमी शेताला आली)
तिने दिली भाकर, खाऊन दिला ढेकर
गोडी न्यारीच चटणीला आली
(गोडी न्यारीच चटणीला आली)

तुझ्या कष्टाची दौलत राख रे
(नको विसावा, नको ती झोप रं)

(मैतर माझ्या रं, ढवळ्या न पवळ्या)
(शेताला घेऊन चाल रं)
(मैतर माझ्या रं, ढवळ्या न पवळ्या)
(शेताला घेऊन चाल रं)



Credits
Writer(s): Bhaskar Mungekar, Shekh Jainuchand
Lyrics powered by www.musixmatch.com

Link