Aala Aala Pawoos Aala

आला-आला, पाऊस आला
बघा-बघा हो आला-आला
पाऊस आला, पाऊस आला

आला-आला, पाऊस आला
बघा-बघा हो आला-आला
पाऊस आला, पाऊस आला

काळ्या-काळ्या मेघांमधुनी
शुभ्र कशा या धारा झरती
अवतीभवती झुलू लागल्या जलधारांच्या माळा

पाऊस आला, पाऊस आला
आला-आला, पाऊस आला
बघा-बघा हो आला-आला
पाऊस आला, पाऊस आला

हसली झाडें, हसली पानें
हसली झाडें, हसली पानें
फुलें-पाखरें गाती गाणे
ओल्या-ओल्या मातीचा ही श्वास सुगंधी झाला

पाऊस आला, पाऊस आला
आला-आला, पाऊस आला
बघा-बघा हो आला-आला
पाऊस आला, पाऊस आला

धरणी दिसते प्रसन्न सारी
पागोळ्यांची नक्षी न्यारी
फांदी-फांदीवरी थाटली थेंबांची ही शाळा

पाऊस आला, पाऊस आला
आला-आला, पाऊस आला
बघा-बघा हो आला-आला
पाऊस आला, पाऊस आला



Credits
Writer(s): Vandana Vitankar, Meena Khadikar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link