Aai Aai Yena Zara

आई-आई ये ना जरा बाबाकडे बघ
आई-आई ये ना जरा बाबाकडे बघ
बाबाच्या डोळ्यामध्ये पावसाचे ढग
आई जरा बघ, जरा बघ

आई-आई ये ना जरा बाबाकडे बघ
बाबाच्या डोळ्यामध्ये पावसाचे ढग
आई जरा बघ, जरा बघ
बाबा असा बघायला दिसे ना गं बरा
अळीमिळी, गुपचिळी पडलेला वारा
बाबा असा बघायला दिसे ना गं बरा
अळीमिळी, गुपचिळी पडलेला वारा

हले नाही, डूले नाही जसा काही फोटो
हले नाही, डूले नाही जसा काही फोटो
आवाजही त्याला माझा लांबूनच येतो
आई जरा बघ, जरा बघ
उभा तर उभा आणि बसे तर बसे
हसे तेव्हा अजुनच कसनुसा दिसे
उभा तर उभा आणि बसे तर बसे
हसे तेव्हा अजुनच कसनुसा दिसे

विचारले, "बाबा, काय पाहतोस सांग?"
बघे म्हणे, "आभाळाचा लागतो का थांग"

काय सांगू पोरी, तुला कळणार नाही
आभाळ ना आले हाती, जमीनही नाही
चहूकडे कोंडलेल्या जगण्याच्या दिशा
हाती नाही काम गाडा चालायाचा कसा?
हाती नाही काम गाडा चालायाचा कसा?

घोडा झालो तरी काही शिकलोच नाही
विकायाच्या जगामध्ये टिकलोच नाही
आई जरा बघ, जरा बघ

आणि मग उठोनिया कुशीमध्ये घेतो
ओले डोळे पुसोनिया ओली पापी घेतो
घाबरतो जीव, बाबा, असे काय बोले
चित्रातले रंग त्याच्या जसे ओले-ओले

चेहऱ्याचा रंग त्याच्या सांग कोणी नेला?
चेहऱ्याचा रंग त्याच्या सांग कोणी नेला?
हसणारा बाबा कुणी पळवून नेला?
हसणारा बाबा कुणी पळवून नेला?
आई जरा बघ, जरा बघ

आई-आई ये ना जरा बाबाकडे बघ
बाबाच्या डोळ्यामध्ये पावसाचे ढग
आई जरा बघ, जरा बघ
आई जरा बघ, जरा बघ



Credits
Lyrics powered by www.musixmatch.com

Link