Mee Marathi

मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी
मराठी, मी मराठी, मराठी, मी मराठी

दरि-खोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिनराती
मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी
मी मराठी, मी मराठी, मराठी, मी मराठी

घोर संकटे झेलून घेतील अमुचे अजिंक्य बाहू
काळाशी ही झुंज देऊनी सदैव विजयी राहू
घोर संकटे झेलून घेतील अमुचे अजिंक्य बाहू
काळाशी ही झुंज देऊनी सदैव विजयी राहू

जरी रांगडा बाणा अमुचा जीवास जीव ही देऊ
अंगावर कोणी आले शिंगावरती घेऊ

साधे-भोळे दिसतो परी, गुण अमुच्या ठायी कोटी
एकदिलाने उमटू दे जय घोष आज हा ओठी

दरि-खोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिनराती
मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी
मी मराठी, मी मराठी, मराठी, मी मराठी

महाराष्ट्र भू तुला मानतो सकळ जनांची आई
तुझ्या कुशीतुन सकळांसाठी अंकुरते अंगाई
महाराष्ट्र भू तुला मानतो सकळ जनांची आई
तुझ्या कुशीतुन सकळांसाठी अंकुरते अंगाई

संघर्षाचे शौर्य दिले तु, धैर्य दिले जगण्याचे
तुझ्याच ठायी कृतार्थ व्हावे अवघे जीवन अमुचे
तुझाच जय जयकार असावा सदैव अमुच्या ओठी

दरि-खोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिनराती
मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी
मी मराठी, मी मराठी, मराठी, मी मराठी



Credits
Writer(s): Chandrshekhr Sanekar, Avadhoot Gupte
Lyrics powered by www.musixmatch.com

Link