Vithhala Tu Veda Kumbhar

फिरत्या चाकावरती देसी
मातीला आधार
विठ्ठला, तू वेडा कुंभार
विठ्ठला, तू वेडा कुंभार

माती-पाणी, उजेड-वारा
तूच मिसळसी सर्व पसारा
माती-पाणी, उजेड-वारा
तूच मिसळसी सर्व पसारा

आभाळच मग ये आकारा
तुझ्या घटांच्या उतरंडीला
नसे अंत, ना पार
...तू वेडा कुंभार
विठ्ठला, तू वेडा कुंभार

घटा-घटाचे रूप आगळे
प्रत्येकाचे दैव वेगळे
घटा-घटाचे रूप आगळे
प्रत्येकाचे दैव वेगळे

तुझ्याविना ते कोणा नकळे
मुखी कुणाच्या पडते लोणी
कुणा मुखी अंगार
...तू वेडा कुंभार
विठ्ठला, तू वेडा कुंभार

तूच घडविसी, तूच फोडीसी
कुरवाळीसी तू, तूच ताडीसी
तूच घडविसी, तूच फोडीसी
कुरवाळीसी तू, तूच ताडीसी

नकळे यातुन काय जोडिसी?
देसी डोळे परि निर्मिती
तयांपुढे अंधार
...तू वेडा कुंभार
विठ्ठला, तू वेडा कुंभार

फिरत्या चाकावरती देसी
मातीला आधार
विठ्ठला, तू वेडा कुंभार
विठ्ठला, तू वेडा कुंभार



Credits
Writer(s): G D Madgulkar, Sudhir V Phadke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link