Kunachya Khandyavar Kunache Oze

कुणाच्या खांद्यावर कुणाचें ओझे

कशासाठी उतरावें तंबू ठोकून?
कोण मेलें कुणासाठी रक्त ओकून?
जगतात येथें कुणी मनांत कुजून!
तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे?

दीप सारे जाती येथे विरून, विझून
वृक्ष जाती अंधारांत गोठून, झडून.
जीवनाशीं घेती पैजा घोकून घोकून,
म्हणती हे वेडे पीर तरी आम्ही राजे!



Credits
Writer(s): Aarti Prabhu, Bhaskar Chandavarkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link