Kashi Kaal Nagini

कशी काळ नागिणी, सखे गं, वैरिण झाली नदी
प्राणविसावा पैल तीरावरी
प्राणविसावा पैल तीरावरी
अफाट वाहे मधी

कशी काळ नागिणी, सखे गं, वैरिण झाली नदी

सुखी मीन हे तरति न गणुनी, लाटा कोट्यावधी
सुखी मीन हे तरति न गणुनी, लाटा कोट्यावधी
सुखी पाखरे गात चालली
सुखी पाखरे गात चालली
पार वादळी सुधी

कशी काळ नागिणी, सखे गं, वैरिण झाली नदी

पैलतटि न का तृण मी झाले?
तुडविता तरी पदी
पैलतटि न का कदंब फुलले?
पैलतटि न का कदंब फुलले?
करिता माळा कधी

कशी काळ नागिणी, सखे गं, वैरिण झाली नदी

पापिण खिळले तिरा
पापिण खिळले तिरा विरह हा
शस्त्राविण वधी
प्राणाचे घे मोल नाविका
प्राणाचे घे मोल नाविका
लावि पार, ने अधी

कशी काळ नागिणी, सखे गं, वैरिण झाली नदी



Credits
Writer(s): Hridaynath Mangeshkar, B R Tambe
Lyrics powered by www.musixmatch.com

Link