Nuste Nuste Dole Bhartana

नुसते-नुसते डोळे भरताना
नुसते-नुसते काही स्मरताना
पाहू पुन्हा परतूनी साऱ्या खुणा
वाटा जुन्या सरताना (थोडे धुके विरताना)
नुसते-नुसते डोळे भरताना

काहूर हे, अवचित काहूर हे
उठता ध्यानी-मनी आज काहूर हे
सारे कसे आता माझे-तुझे
जवळी असूनी किती भासते दूर हे

उरल्या-सरल्या जखमा भरताना
वाटा जुन्या सरताना, थोडे धुके विरताना
नुसते-नुसते डोळे भरताना

वळणावरी या आज सांज झाली
घरट्यातली ही पाखरे निघाली
परतीचे वेडे गाणे घालते उखाणे
भिजल्या शब्दांना, खिजल्या अर्थांना
विझल्या वातींना, निजल्या रातींना

पापणीत ओले आभाळ भरताना
(वाटा जुन्या सरताना) थोडे धुके विरताना

नुसते-नुसते डोळे भरताना
नुसते-नुसते काही स्मरताना
पाहू पुन्हा परतूनी साऱ्या खुणा
वाटा जुन्या...



Credits
Writer(s): Sowmitra, Anand Modak
Lyrics powered by www.musixmatch.com

Link