Na Kalata Ase Kon

न कळता असे कोण मागुन येते,
सुखाची पुन्हा दुःख चाहूल घेते.

न कळता असे कोण मागुन येते,
सुखाची पुन्हा दुःख चाहूल घेते.

कितीदा हसुन नव्याने जगावे,
किती रंग या जीवनाचे पहावे.

न कळता असे कोण मागुन येते,
सुखाची पुन्हा दुःख चाहूल घेते.

जुई मोगरयाला जसा गंध येतो,
नवा गार वारा वनी वाहताना.

मना सारखी मी तुझी होत जाते,
तुला सांजवेळी पुन्हा पाहताना.

पुन्हा एक मेकास् आधार होता,
तुला मी मला तु आता पांघरावे.

पुन्हा एक मेकास आधार होता,
तुला मी मला तु आता पांघरावे.

तुझ्या वाचूनी मी इथे रहाताना,
तुझ्या आठवांचा मनी जोगवा रे.

घरा सारखे वाटणारे तरीही,
नसे या घराला जुना गोडवा रे...

घरी लोक माझेच तरीही,
असे एकटे पण कसे मी सहावे...
.जरी आपुले रक्त गोठून गेले.
जरी भोवती सुन्न अंधार आहे.

तुझा हात हातात आहे अजुनही,
तुझी ज्योत जगण्यास आधार आहे.

सुखालाच नाकारताना कशाला,
उगाच आज डोळ्यानी पाझरावे.

कितीदा हसुन नव्याने जगावे,
किती रंग या जीवनाचे पहावे.

नदी जीवनाची तरी वाहते रे,
कधी उन वा सावली लागते रे...

नवे गाव वाटा नव्याने शोधूनी,
या दिषा तांबडी ही रोज सांगिते रे.

पुन्हा एकदा तु जगावे जगावे,
नवे रंग या जीवनाचे पहावे.

पुन्हा एकदा तु जगावे जगावे,
नवे रंग या जीवनाचे पहावे...



Credits
Writer(s): Soumitra
Lyrics powered by www.musixmatch.com

Link