Man Manaas Umgat Naahi

मन मनास उमगत नाही
आधार कसा शोधावा?

मन मनास उमगत नाही आधार कसा शोधावा?
स्वप्नातील पदर धुक्याचा हातास कसा लागावा?
आधार कसा शोधावा? मन मनास उमगत नाही

मन थेंबांचे आकाश
मन थेंबांचे आकाश लाटांनी सावरलेले
मन थेंबांचे आकाश लाटांनी सावरलेले
मन नक्षत्रांचे रान
मन नक्षत्रांचे रान अवकाशी अवघडलेले
मन गरगरते आवर्त, मन रानभूल, मन चकवा

आधार कसा शोधावा? मन मनास उमगत नाही

मन काळोखाची गुंफा, मन तेजाचे राऊळ
मन काळोखाची गुंफा, मन तेजाचे राऊळ

मन सैतानाचा हात, मन देवाचे पाऊल
मन सैतानाचा हात, मन देवाचे पाऊल
मन देवाचे पाऊल

दुबळया गळक्या झोळीत हा सूर्य कसा झेलावा?
आधार कसा शोधावा? मन मनास उमगत नाही

चेहरा-मोहरा ह्याचा कुणी कधी पाहीला नाही
कुणी कधी पाहीला नाही
धनी अस्तित्वाचा तरीही, ह्याच्याविण दुसरा नाही
ह्याच्याविण दुसरा नाही

ह्या अनोळखी नात्याचा, कुणी कसा भरवसा द्यावा
आधार कसा शोधावा? मन मनास उमगत नाही
आधार कसा शोधावा?

स्वप्नातील पदर धुक्याचा हातास कसा लागावा?
आधार कसा शोधावा? मन मनास उमगत नाही



Credits
Writer(s): Ravi Daate, Sudhir Moghe
Lyrics powered by www.musixmatch.com

Link