Kadhi Barasato Me

कधी बरसतो मी रिमझिम-रिमझिम
कधी गर्जतो मी विजेत चमचम

पानं-फुलातून हिरवे हसतो
कृतार्थ पावन धन्य भासतो

कधी बरसतो मी रिमझिम-रिमझिम
कधी गर्जतो मी विजेत चमचम

कणखर भूमी चिंब भिजवूनी
सहस्त्रधरेनी धान्य पिकवितो
कणखर भूमी चिंब भिजवूनी
सहस्त्रधरेनी धान्य पिकवितो

नद्या-सरोवर तुडुंब भरुनी
मनांमनातून मी संगीत म्हणतो

कधी बरसतो मी रिमझिम-रिमझिम
कधी गर्जतो मी विजेत चमचम

उंच कपारीतुन निखळतो
जणू तेजाने मी सळसळतो
उंच कपारीतुन निखळतो
जणू तेजाने मी सळसळतो

कड्या वरूनही जई झुळझुळतो
अल्लड बाळा समान रमतो

कधी बरसतो मी रिमझिम-रिमझिम
कधी गर्जतो मी विजेत चमचम

ईकडून-तिकडून वाहे पाणी
नांव कागदी गाते गाणी
ईकडून-तिकडून वाहे पाणी
नांव कागदी गाते गाणी

अवखळ ओले भाव झिरपती
"पाऊस आला," सारे म्हणती

कधी बरसतो मी रिमझिम-रिमझिम
कधी गर्जतो मी विजेत चमचम



Credits
Writer(s): Ashok Patki, Rekha Gandewar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link