Taar Kaifatale

तार कैफातले छेडतो मी
तार कैफातले छेडतो मी
जिंदगीच्या गुलाबी क्षणी
दिलरूबाला जरी पाहतो मी
मिलनाच्या मधुदर्पणी
तार कैफातले छेडतो मी

गोड स्वप्नातूनी जागविले
कंकणाच्या स्वरांनी मला
गोड स्वप्नातूनी जागविले
कंकणाच्या स्वरांनी मला

सांगती पाकळ्या पापण्यांच्या
भावार्थ नयनातला
मौन माझे कसे भंग झाले?
मौन माझे कसे भंग झाले?
गीत इश्कातले ऐकुनी

दिलरूबाला जरी पाहतो मी
मिलनाच्या मधुदर्पणी
तार कैफातले छेडतो मी

बंध तोडुनी हे रेशमाचे
सैल झाला सुगंधी जुडा
बंध तोडुनी हे रेशमाचे
सैल झाला सुगंधी जुडा

मंद श्वासांपरी दरवळे
अंग-अंगातुनी केवढा
रातगंधासवे जागतो मी
रातगंधासवे जागतो मी
सोबतीला असे यामिनी

दिलरूबाला जरी पाहतो मी
मिलनाच्या मधुदर्पणी
तार कैफातले छेडतो मी

अंग चोरूनी येई पहाटे
प्रेयसीची गुलाबी छवी
अंग चोरूनी येई पहाटे
प्रेयसीची गुलाबी छवी

सुप्त आभास सारे वितळती
स्मितहास्यात त्या लाघवी
घेत अंगडाई जेव्हा निघे ती
घेत अंगडाई जेव्हा निघे ती
माझिया बाहुपाशातुनी

दिलरूबाला जरी पाहतो मी
मिलनाच्या मधुदर्पणी
तार कैफातले छेडतो मी
तार कैफातले छेडतो मी

जिंदगीच्या गुलाबी क्षणी
दिलरूबाला जरी पाहतो मी
मिलनाच्या मधुदर्पणी
तार कैफातले छेडतो मी

तार कैफातले छेडतो मी
तार कैफातले छेडतो मी



Credits
Writer(s): Hemant Gayakwad, Vijay Joshi
Lyrics powered by www.musixmatch.com

Link