Maaiya Maatiche Gayan

माझ्या मातीचे गायन तुझ्या आकाश श्रुतीनी

माझ्या मातीचे गायन तुझ्या आकाश श्रुतीनी
जरा कानोसा देऊन, जरा कानोसा देऊन
कधी ऐकशील का रे? कधी ऐकशील का रे?
माझ्या मातीचे गायन तुझ्या आकाश श्रुतीनी

माझी धुळीतील चित्रे तुझ्या प्रकाश नेत्रांनी
माझी धुळीतील चित्रे तुझ्या प्रकाश नेत्रांनी

जरा पापणी खोलून, जरा पापणी खोलून
कधी पाहशील का रे? कधी पाहशील का रे?
कधी ऐकशील का रे?
माझ्या मातीचे गायन तुझ्या आकाश श्रुतीनी

माझ्या जहाजाचे पंख मध्यरात्रीत माखले
माझ्या जहाजाचे पंख मध्यरात्रीत माखले

तुझ्या किनाऱ्यास दिवा, तुझ्या किनाऱ्यास दिवा
कधी लावशील का रे? कधी लावशील का रे?
कधी ऐकशील का रे?
माझ्या मातीचे गायन तुझ्या आकाश श्रुतीनी

माझा रांगडा अंधार मेघा-मेघात साचला
माझा रांगडा अंधार मेघा-मेघात साचला

तुझ्या उषेच्या कानी, तुझ्या उषेच्या कानी
कधी टिपशील का रे? कधी टिपशील का रे?
कधी ऐकशील का रे?

माझ्या मातीचे गायन तुझ्या आकाश श्रुतीनी
जरा कानोसा देऊन, जरा कानोसा देऊन
कधी ऐकशील का रे? कधी ऐकशील का रे?
माझ्या मातीचे गायन तुझ्या आकाश श्रुतीनी



Credits
Writer(s): Shridhar Fadke, Kusuma Graj
Lyrics powered by www.musixmatch.com

Link