Maay Yashoda Haalvi Palna

(आले शारंगपाणी)
(पिंगा घाल गं गौळणी)
(आले शारंगपाणी)
(पिंगा घाल गं गौळणी)

आकाशीच्या चांदासाठी
(आकाशीच्या चांदासाठी)
फिरती चांदण्या अनंतकोटी
(फिरती चांदण्या अनंतकोटी)

(आकाशीच्या चांदासाठी)
(फिरती चांदण्या अनंतकोटी)

चमकत त्यांच्यावानी
(पिंगा घाल गं गौळणी)
(आले शारंगपाणी)
(पिंगा घाल गं गौळणी)

गुणगुण गाणे गातो भुंगा
(गुणगुण गाणे गातो भुंगा)
कळ्या उधळती सुगंधरंगा
(कळ्या उधळती सुगंधरंगा)

(गुणगुण गाणे गातो भुंगा)
(कळ्या उधळती सुगंधरंगा)

डोलत त्यांच्यावाणी
(पिंगा घाल गं गौळणी)
(आले शारंगपाणी)
(पिंगा घाल गं गौळणी)

तक्थई, तक्थई माझा पिंगा
(तक्थई, तक्थई माझा पिंगा)
येई तकतकी गोऱ्या रंगा
(येई तकतकी गोऱ्या रंगा)

(तक्थई, तक्थई माझा पिंगा)
(येई तकतकी गोऱ्या रंगा)

केतकी पानावानी
(पिंगा घाल गं गौळणी)
(आले शारंगपाणी)
(पिंगा घाल गं गौळणी)

पिंगा गोऱ्या रंगाचा गं
(पिंगा गोऱ्या रंगाचा गं)
चपळ गोजिऱ्या अंगाचा गं
(चपळ गोजिऱ्या अंगाचा गं)

(पिंगा गोऱ्या रंगाचा गं)
(चपळ गोजिऱ्या अंगाचा गं)

तहान दिसते नयनी
(पिंगा घाल गं गौळणी)
(आले शारंगपाणी)
(पिंगा घाल गं गौळणी)

माय यशोदा हलवी पाळणा
माय यशोदा हलवी पाळणा
गोड गीत गाई
बालमुकुंदा, मेघ:श्यामा करी गाई-गाई

भरुनी येता हात
जरा ती झोका थांबवूनी
उठे पाळण्यापाशी येई
पाही डोकावूनी

हात-पाय नाचवी, श्रीहरी
हासुन वरी पाही
माय यशोदा हलवी पाळणा
गोड गीत गाई

दिसमासाने कृष्ण वाढला
लागे रांगाया
धरावयासी धावे माता
वाऱ्यासी वाया

पुरे पडे ना वाडा-अंगण
अपुरे त्या होई
माय यशोदा हलवी पाळणा
गोड गीत गाई

पिंगा बाई, पिंगा, हो, पिंगा बाई, पिंगा
हो, पिंगा बाई, पिंगा, पिंगा बाई, पिंगा
हो, पिंगा बाई, पिंगा, पिंगा बाई, पिंगा
हो, पिंगा बाई, पिंगा, पिंगा बाई, पिंगा



Credits
Writer(s): G D Madgulkar, Sudhir V Phadke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link