Gaayeli Gaani Tujhi

गायिली गाणी तुझी साऱ्या फुलांनी
रात्रभर जागून जी लिहिली कळ्यांनी

देह चाफा उमलण्याचा एक क्षण तो
श्वास तेव्हा रोखले होते दिशांनी

केतकी कांती तुझी झळके अशी की
लाविली तुजला जणू मेंदी वीजांनी



Credits
Writer(s): Chandrashekhar Achut Sanekar, Mayuresh Satish Pai
Lyrics powered by www.musixmatch.com

Link