Jivant Ahe

{ जिवंत आहे जरा जरा मी दिवा जसा विझताना ...
अखेरची भेट आपली या उदास खिन्न क्षणांना ...
तुटून गेलेत सर्व धागे आता कुणी न तुझा मी ...
विरून जातील प्राण माझे उद्या नसेन कुठेही ...
जळे हृदय माझे ... कधी तुझेच जे होते...
आता कसे तुझ्यावीण... या जीवनाचे वाहायचे ओझे ... } - २

कळे न कुठले तुफान आले लुटून नेले दिव्यांना ...
अनोळखी लागलो दिसु मी तुझ्याच मग डोळ्यांना ...
कशी तुझी ही नजर बदलली तुला कशास विचारू...
आता न फिरशील कधीच मागे तुला कशास पुकारू...
नव्या दिशा अन नवीन वाटा तुझा नवीन किनारा ...
दिलास तू सोबतीस मजला भयाण वादळ वारा ...
जळे हृदय माझे... कधी तुझेच जे होते...
आता कसे तुझ्यावीण... या जीवनाचे वाहायचे ओझे ...

मनात जे एक स्वप्न होते तडेच त्याला गेले ...
जळून गेली तहान माझी तृषार्त ओठ जळाले ...
जरी कितीही पूर आसवाचे उरत माझ्या आले ...
टिपूस हि पापणीत नाही सुकून गेले डोळे...
उन्हात माझा प्रवास आता नसेल सोबत कोणी ...
कधीतरी सापडेल तुजला धुळीत माझी विराणी ...
जळे हृदय माझे कधी... तुझेच जे होते...
आता कसे तुझ्यावीण... या जीवनाचे वाहायचे ओझे ...

जिवंत आहे जरा जरा मी दिवा जसा विझताना ...
अखेरची भेट आपली या उदास खिन्न क्षणांना ...
तुटून गेलेत सर्व धागे आता कुणी न तुझा मी ...
विरून जातील प्राण माझे उद्या नसेन कुठेही ...
जळे हृदय माझे ... कधी तुझेच जे होते...
आता कसे तुझ्यावीण... या जीवनाचे वाहायचे ओझे ...

Credits
Writer(s): Atul Gogavale, Ajay Gogavale, Chandrashekhar Achut Sanekar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link