Zilayi Chadhli Swapnanchi (Poem Recital)

झिलई चढली स्वप्नांची
आतुरल्या सागरा
गर्द निळ्या डोळ्यात
माझिया चंद्राचा चेहरा

मेघांवरती कधी रूपेरी
कधी निळा जांभळा
पाण्यातून तरंगत आहे
स्वप्नांचा सोहळा

गर्द मखमली गार गुलाबी
कसेकसे सांगावे
मनातली भाषा सांगाया
शब्द कुणा मागावे

नव्यानव्या स्पर्शाची आशा
आर्त मनात तरंग नवा
तुझ्याकडे मी धावत आले
ह्रदय मागते रंग नवा



Credits
Writer(s): Milind Milind
Lyrics powered by www.musixmatch.com

Link