Valvantatun Bhishan Vairan

वाळवंटातून भीषण वैराण
चालले जीवन, चालले जीवन
वाळवंटातून भीषण वैराण
चालले जीवन, चालले जीवन, चालले जीवन

वाळूचा सागर, क्षितिज चौफेर
वाळूचा सागर, क्षितिज चौफेर
त्यावर लोळते जळते अंबर

रेतीस नाचवी वाफेचे तुफान
चालले जीवन, चालले जीवन

वाळवंटातून भीषण वैराण
चालले जीवन, चालले जीवन, चालले जीवन

गेले रे, गेले रे, संगती सोबती
गेले रे, गेले रे, संगती सोबती
पुसट पाऊले ठेवून मागुती

कितीक जायाचे असेच अजून
चालले जीवन, चालले जीवन, चालले जीवन

कलला, कलला, दिवस कलला
कलला, कलला, दिवस कलला
उंटांच्या पायांनी काळ हा चालला

लांबल्या सावल्या, चालल्या सोडून
चालले जीवन, चालले जीवन

वाळवंटातून भीषण वैराण
चालले जीवन, चालले जीवन, चालले जीवन, चालले जीवन



Credits
Writer(s): Yashvant Dev, Shankar Vaidya
Lyrics powered by www.musixmatch.com

Link